Home शासकीय महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरे होणार

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरे होणार

3 second read
0
0
27

no images were found

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरे होणार

 

 

 

 कोल्हापूर, : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे . महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथे होणार असून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्यावरवर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यापुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाची संकल्पना श्री .सुधीर मुनगंटीवार, मा मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून  श्री. विकास खारगे मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य सादरीकरण होणार आहे. सहा महसुली विभागापैकी पुणे विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजमाता जिजाऊसाहेब सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी दिनांक १३ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमालाश्री सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य तसेच कोल्हापूर शहराचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच स्थानिक खासदार आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी भरभरून उपस्थिती लावावी, असे आवाहन श्री. विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…