आयप्रू एज वापरणाऱ्यांची उत्पादकता 37% ने वाढली आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सने सल्लागारांसाठी खास तयार केलेला आयप्रू एज अॅप वापरणाऱ्या सल्लागारांच्या उत्पादकतेत H1-FY2025 मध्ये 37% वाढीचा अनुभव आला. ज्यामुळे त्यांच्या कमाईतही वाढ झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयप्रू एज अॅप (IPRU Edge) वापरणाऱ्या 98.1% एजंटना एकाच दिवशी त्यांचे कमिशन प्राप्त झाले. आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स ही पहिली जीवन विमा कंपनी आहे, जी निवडक वितरकांना एकाच दिवशी कमिशन देते. कंपनीकडे 2 लाखांहून अधिक इन्शुरन्स सल्लागारांचे भक्कम जाळे आहे. कंपनीचे 61% प्रमुख सल्लागार आता अॅपचा सक्रियपणे वापर करत आहेत. ज्यामुळे त्यांना …