
no images were found
केंद्रीय अर्थसंकल्पावर एचडीएफसी बँकेच्या प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता यांची प्रतिक्रिया
एचडीएफसी बँकेच्या प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता म्हणाल्या की,मध्यमवर्गीयांमधील कमी होणर्या मागणीत वाढ होण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात वैयक्तिक इन्कम टॅक्सच्या विविध स्तरांमध्ये बदल घडवण्यात आला आहे. यामुळे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सच्या लिमिट मध्ये ही बदल करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांची मागणी वाढून मध्यमवर्गीय लोकांमध्ये बचत घडेल, कारण वाढती महागाई आणि उत्पन्नातील वाढ कमी झाल्याने मध्यमवर्गासमोर आव्हाने होती.सामान्य माणसाच्या गोष्टींपलिकडे जाऊन अर्थसंकल्पाने इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सुधारणा करण्यावर भर देऊन ‘लाईट टच’ नियामक दृष्टिकोनाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. पुढील पाच वर्षांच्या आर्थिक नियोजनामुळे कृषी, एमएसएमईज, निर्यात यांसह खाजगी क्षेत्राने सहभागी होऊन भारताची क्षमता वाढवण्यावर जोर दिला आहे.
अर्थमंत्र्यांच्या आर्थिक योजने ने वापर वाढवण्यावर एकीकडे जोर दिला असतांनाच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाबाबत च्या लक्ष्यामध्ये विशेष बदल करण्यात आलेला नाही.अर्थसंकल्पामुळे जो आर्थिक एकत्रिकरणाच्या योजनेला काऊंटर सायकलिकल पुश मिळत असल्याने २०२५-२६ ची भांडवली तूट ही ४.४ टक्के राहणार आहे. आयकरातील बदलांमुळे जरी महसूल कमी होत असला तरीही खर्चाच्या बाबतीत बचत करुन २०२५-२६ साठीची तूट भरुन निघणार आहे.आजच्या अर्थसंकल्पातील घोषणांमुळे २०२५-२६ ची जीडीपी वाढ ही ६.६ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. बाँड मार्केट्ससाठी कोणतेही सरप्राईजनाही कारण बाजारपेठेतील कर्जे ही अपेक्षेनुसारच आहेत. यासह दरातील कपातींची अपेक्षा आणि आरबीआय कडून ओपन मार्केट खरेदीमुळे बाँड्सचे उत्पन्न हे कमी होण्याची शक्यता आहे.