Home औद्योगिक २२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

17 second read
0
0
6

no images were found

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

दि. ०६ ते ०९ फेब्रुवारी २०२५  दरम्यान  नवीन  कृषी  महाविद्यालय  पटांगण, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या  वेळेत  आयोजित  करण्यात  आले  आहे.महाटेकचे हे २२ वे वर्ष असून ह्या प्रदर्शनात भारता मधून ४०० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून जवळपास २५,००० हून अधिक ग्राहक भेट देणार आहेत.या प्रदर्शनात सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.महाटेक २०२५ च्या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री माननीय श्री. उदय सामंत, (महाराष्ट्र राज्य)  आणि श्री  विनोद ग्रोवर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कैझेंन इन्स्टिट्यूट (सैन ) एल.एल .पी यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता केले जाईल.

 

महाटेकच्या या  चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशनव ऑटोमेशन इक्विपमेंट्स, फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीज मधील कॉर्पोरेट्स, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध आहे. महाटेकच्या या प्रदर्शना मध्ये जवळपास ८०० ते १००० कोटींची उलाढाल होते.

या प्रदर्शनासाठी ऑल इंडिया असोसियेशन ऑफ इंडस्ट्रीस , COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन), मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीस (गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा),  गोकुळ शिरगाव मॅन्यूफॅक्चरर्स  असोसिएशन, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, मध्यप्रदेश क्स` यांचे सहकार्य लाभले आहे.

महाटेकचे विशेष प्रायोजक :

• प्लॅटिनम प्रायोजक  :  एक्स्सेल एनक्लोषर, 

• इंडस्ट्रियल एजुकेशन पार्ट्नर:  एम. आय. टी  स्कूल ऑफ डिस्टेन्स एजुकेशन  

 

हे प्रदर्शन,औद्योगिक उत्पादने आणि सेवांचा ग्राहकांपर्यंत प्रचार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम ठरले आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, यांनी, त्यांच्या अनोख्या प्रकाशनाच्या पायाभरणीसह, औद्योगिक व्यापार मेळावे आणि तांत्रिक परिषदांचे क्षेत्र सुव्यवस्थित करण्यासाठी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड   तळस…