
no images were found
कोल्हापूरात १०० एकर जागेत आय.टी. पार्क निर्मित साठी : राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी मागणी
मुंबई : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक परिषदेतील गुंतवणूक करारांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १०० एकर जागेत आय.टी. पार्क निर्मिती करण्यात यावी, अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापुरात राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडली आहे. या माध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित शहरांचा विचार करता बेंगलोर, हैदराबाद, पुणे आदी शहरामध्ये आयटी क्षेत्र सर्वात जलद गतीने कार्यानिव्त झाले आहे. यामुळे या शहरांत रोजगार निर्मितीसह शहराच्या विकासामध्ये मोलाची भर पडली आहे. कोल्हापूर शहराचा विचार करता या ठिकाणची भौगोलिक स्थिती आयटी क्षेत्रासाठी पूरक असून आयटी क्षेत्र विकसित झाले नसल्याने कोल्हापूर आयटी क्षेत्रात मागे राहिले आहे.
वास्तविक पाहता, राज्यात मुंबई, पुणे, ठाणे अशा ठराविक जिल्ह्यातच आय.टी.क्षेत्राचा विकास झाल्याने या मेट्रो शहरावर नागरीकरणाचा अतिरिक्त ताण पडत आहे. मर्यादित क्षमतेमुळे येथील नागरिकांना आरोग्य, वाहतूक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मेट्रो सिटी वर पडणारा अतिरिक्त भार विभागण्यासाठी राज्याच्या, देशाच्या विकासात भर घालण्यासाठी राज्यातील इतर शहरे विकसित करण्याचा उद्देश मित्रा संस्थेने ठेवला असून, कोल्हापूर हे प्रथम शहर त्यासाठी निवडले गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील इतर “क” व “ड” वर्ग महानगरपालिका क्षेत्रा आयटी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने शहरात आय.टी.पार्क स्थापन करण्याचा निर्णय शाश्वत परिषदेत घेण्यात आला आहे.
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. राज्याने दुसऱ्या दिवशी पर्यंत सुमारे १५ लाख ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता गेल्या अनेक वर्षात नवीन औद्योगिक प्रकल्प आलेला नाही. कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. त्यामुळे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील गुंतवणूक करारांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १०० एकर जागेत आय.टी. पार्क निर्मिती होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.