महापालिकेचे बजेट म्हणजे ‘स्वप्नांचे इमले आणि कल्पनांचे मनोरे’, महापालिका वसुली करण्यात अपयशी, बजेट अवास्तववादी – आप ची टीका कोल्हापूर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेने नुकताच सन 2025-2026 साठी 1334.76 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 707.64 कोटी इतके महसूली उद्धीष्ट ठेवण्यात आले. परंतु मागचा अनुभव पाहता घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट तसेच परवाना यासारख्या महसूल गोळा करून देणाऱ्या विभागांना 80% देखील वसुली उद्धीष्ट गाठता आलेले नाही. …