Home Video कठीण परिस्थितीतून नावीन्याचा शोध क्रांती नागवेकर – केएनसीच्या वतीने चर्चासत्र उत्साहात

कठीण परिस्थितीतून नावीन्याचा शोध क्रांती नागवेकर – केएनसीच्या वतीने चर्चासत्र उत्साहात

7 second read
0
0
42

no images were found

कठीण परिस्थितीतून नावीन्याचा शोध क्रांती नागवेकर – केएनसीच्या वतीने चर्चासत्र उत्साहात

कोल्हापूर, (प्रतिनिधी):– व्यवसायातील कठीण परिस्थितीतून जात असतानाच नावीन्याचा शोध लागतो, असे प्रतिपादन केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर यांनी आज केले.

केएनसीच्या वतीने जेएमएआयआयई या नावे मुंबईत १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मशिनरीचे सर्वात मोठे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याची माहिती देताना त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, आज आपला व्यवसाय सोने-चांदीच्या दरवाढीने कठीण परिस्थितीतून जात आहे. अशावेळी आपली कला विकता आली पाहिजे. त्यासाठी मशिनरी आणि संबंधित उत्पादनाचे सर्वात मोठे असलेल्या प्रदर्शनाला भेट द्या आणि बाजारात आज नवीन काय आहे, याचा शोध घ्या. त्यातून नक्कीच नवी दृष्टी मिळून व्यवसाय वाढीला दिशा मिळेल. 

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकामध्ये चर्चासत्रामागील उद्देश स्पष्ट केला. व्यवसायात दिवसागणिक नवनवीन आव्हाने आपणासमोर येत आहेत. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला दिशा मिळेल व व्यवसायाला चांगले दिवस येतील. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यासाठी व्यवसाय विस्तारासाठी अशा प्रदर्शनांना भेट देऊन आर्थिक उन्नती साधा. नचिकेत भुरके, नंदू बेलवलकर, बाबासाहेब काशीद यांनीही मार्गदर्शन केले. अशाच प्रकारचे चर्चासत्र हुपरी येथेही झाले. यावेळी नगरसेविका सौ. माधुरी नकाते, किरण नकाते, दिनकर ससे, संजय पाटील, विजय हावळ, प्रीतम ओसवाल, अशोक झाड, जितेंद्र राठोड, विजयकुमार भोसले, संजय खद्रे, राजू चोपडे, संजय चोडणकर, धर्मपाल जिरगे, रवींद्र राठोड, प्रतापसिंह देसाई, सुहास जाधव, नरेंद्र बाफना, शिवाजीराव पोवार, सौ. गीतांजली पेडणेकर, अवधूत मालवणकर, श्याम पाटील, राहुल नागवेकर यांच्यासह मोठ्या संख्येने सराफ व सुवर्ण कारागीर उपस्थित होते. माणिक जैन यांनी स्वागत करून आभार मानले. 

क्लस्टरसाठी सर्व सहकार्य: व्यवसाय विस्तारासाठी एमएसएमईच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करा, त्याला हवी ती मदत करू, असे क्रांती नागवेकर यांनी सांगितले, तर कोल्हापूर येथे क्लस्टर उभारणीसाठी हवे ते सहकार्य करण्याची ग्वाही भरत ओसवाल, राजेश राठोड यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…