no images were found
महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविकांचा सत्कार
कोल्हापूर(प्रतिनिधी) : महायुतीकडून विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात लोकप्रतिनिधींनी केवळ निवडून येणे नव्हे, तर जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.û
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी सांगितले की, निवडून आलेल्या प्रतिनिधींपेक्षा दुप्पट लोकप्रतिनिधी निवडून आल्यासारखे काम करून दाखवले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून कायम जनतेत राहणे, सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध असणे, हेच खरे लोकसेवेचे लक्षण असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेत अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी देता आली नसली, तरीही त्यांनी प्रामाणिकपणे प्रचारात मेहनत घेतली आणि विजयासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे पुढील काळात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी सर्वांना विश्वासात घेऊनच कामकाजाची दिशा ठरवावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
या सत्कार समारंभास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ, खासदार श्री. धनंजय महाडिक, आमदार श्री. अमल महाडिक, आमदार श्री. राजेश क्षीरसागर, माजी खासदार श्री. संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, भाजपा प्रदेश सचिव श्री. महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. आदिल फरास यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभातून महायुतीच्या एकजुटीचे आणि आगामी काळात जनहितासाठी प्रभावी काम करण्याच्या निर्धाराचे दर्शन घडले.