विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सन 2024-25 या वर्षीच्या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम आणि केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ गेल्या शुक्रवारी (दि.२७) झाला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून पुणे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. विशाल लोंढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील न्यूनगंड काढून …