no images were found
मेघा तोडकर यांना ‘रामधारी सिंह दिनकर साहित्य सेवा सन्मान’
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील हिंदीच्या पीएच.डी. विद्यार्थींनी मेघा संभाजी तोडकर यांना मध्यप्रदेशातील नमो फाऊंडेशनने हिंदीचे प्रसिद्ध कवि ‘रामधारी सिंह दिनकर साहित्य सेवा सन्मान’ प्रदान केला. पुरस्काराचे आयोजक राजकुमार जायसवाल ‘विचारक्रांती’ यांनी प्रशस्तिपत्र दिले. हिंदीचे प्रसिद्ध कादंबरीकार प्रेमचंद यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्व विषयी समग्र माहिती विषद करणा-या कवितेसाठी हा सन्मान मिळाला आहे. यासाठी तोडकर यांना हिंदीच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. शहनाज सय्यद, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाची विभागीय शिष्यवृत्ती मिळत आहेत. त्त्यांचे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. त्या सांगली जिल्हातील सावळज येथील रहिवाशी आहेत.