no images were found
केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवलेखक शिबिरात विद्यापीठातील दोघींचा सहभाग
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागातील विद्यार्थीनी तेजस्वीनी रजपूत व सहायक शिक्षिका डॉ. सुषमा चौगले यांनी हैदराबाद (तेलंगणा) येथील केंद्रीय हिंदी संस्थान येथे 14 ते 18 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंदीतर भाषी हिंदी नवलेखक शिबिरात सहभाग घेतला. भारत शासनाच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाच्यावतीने भारतभरातून निवडलेल्या 25 नवलेखकांमध्ये या दोघींचा समावेश होता. यासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांची प्रेरणा व डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.