Home शैक्षणिक डीकेटीईच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला हृद्य प्रकाशन समारंभ ‘मनोबला‘ ऍड प्रिती पटवा यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

डीकेटीईच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला हृद्य प्रकाशन समारंभ ‘मनोबला‘ ऍड प्रिती पटवा यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

6 second read
0
0
26

no images were found

डीकेटीईच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला हृद्य प्रकाशन समारंभ ‘मनोबला‘ ऍड प्रिती पटवा यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

 
इचलकरंजी (प्रतिनिधी) – डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत प्रथम वर्ष स्वागत कार्यक्रम २०२४ -२५ साठी बी.टेक. एम.बी.ए. आणि डिप्लोमा विद्यार्थ्यासाठी घोरपडे नाटयगृह येथे कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मनोबला या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जे ऍड प्रिती प्रकाश पटवा याचे जीवन संघर्ष कथन आहे आणि हे पुस्तक एनएसएस प्रमुख प्रा.एस.जी. कानिटकर यांनी लिहिले आहे. ऍड प्रीती पटवा पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त घोरपडे नाटयगृहामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थितीतील श्रोत्यांनी हृद्य व भावपूर्ण समारंभ अनुभवला. छोटया छोटया कारणांनी धडधाकट माणसे निराश होतात आगदी अत्माहत्येपर्यंत जातात तेथे मानेखालचे संपूर्ण शरिर निकामी झालेली स्त्री जीवनावर कसे प्रेम करते हे नव्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसावे म्हणून हा कार्यक्रम आयोजला होता.
‘मस्न्युलर डिस्ट्रॉफी‘ या अव्हानात्मक परिस्थितीशी झुंज देवून त्यांनी शारिरीक मर्यादांवर मात करुन विद्यार्थ्यांना सक्षमपणे घडविले आहे एक यशस्वी वकील आणि एक आदर्श शिक्षिका असे उल्लेखनीय कार्य या पुस्तकात वर्णिले आहे. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर एन.एस.एस. चे संचालक डॉ श्री तानाजी चौगुले यांच्या हस्ते, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे व संचालिका प्रा. डॉ एल.एस.आडमुठे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.  डी.के.टी.ई. चे प्राध्यापक सचिन कानिटकर यांनी ‘मनोबला‘ या नावाच्या त्यांच्या ४० व्या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.  डीकेटीईचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ तानाजी चौगुले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ सपना आवाडे यांची भाषणे साहित्यरुचीपर व समयोचित असल्याने सर्वांना आवडली.
हे पुस्तक केवळ दिव्यांग मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठीच नव्हे तर धडधाकट मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठीही अतिशय उपयुक्त आहे.  या पुस्तकाचा उददेश नव्या विद्यार्थ्यांना कर्तृत्व सिध्द करण्याची जिदद निर्माण होण्यासाठी होईल, अपयश आले तर न खचता त्या अपयशावर कश्याप्रकारे मात करावे यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असा विश्‍वास या ठिकाणी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी काढले. यानंतर या ‘जीवनावर शतदा प्रेम करावे‘ हा विषय घेवून ऍड प्रिती पटवा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रारंभी डॉ एल.एस. आडमुठे यांनी प्रास्ताविक केले.  लेखक प्रा. सचिन गोपाळ कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि समारंभाचे आभारप्रदर्शन इन्स्टिटयूटचे डे. डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे.पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ ए.ए.रायबागी व प्रतिक्षा पाटील यांनी केले. समारंभाला सर्व पदाधिकारी, आनंद पटवा व पटवा कुटुंबीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक आदी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…