no images were found
विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सन 2024-25 या वर्षीच्या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम आणि केंद्रातील
यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ गेल्या शुक्रवारी (दि.२७) झाला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून पुणे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे
उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. विशाल लोंढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःला ओळखले पाहिजे. कोणत्याही बाबतीत यशस्वी होण्यासाठी स्वउद्बोधनाची आवश्यकता असते.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःमधले चांगले गुण स्वतःच ओळखले पाहिजेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. चरित्रात्मक पुस्तके प्राधान्याने वाचावीत. केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहिली पाहिजे, अशी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक डॉ.जगन कराडे यांनी केले. त्यानंतर या केंद्रात अभ्यास करून एम.पी.एस.सी व इतर स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या
विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक मनोगते झाली. रोहित सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.