आगामी महिनाभरातील सर्व अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – आमदार निरंजन डावखरे कोल्हापूर, : भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्चिम आणि महानगरचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चा अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आजच्या मीटिंगचा उद्देश समजून सांगितला. प्रारंभी प्रदेश …