no images were found
मराठा आरक्षणासाठी सरकारने आंदोलकांसोबत सामंजस्याची भूमिका घ्यावी-हेमंत पाटील :वंचित,उपेक्षितांच्या आरक्षणासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न आवश्यक
पुणे,: घटनेने इतर मागासवर्गीयांना अर्थात ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे त्यांच्यावर केला जाणारा अन्याय ठरेल. अशात मराठा समाजावर अन्याय होवू नये यासाठी त्यांच्या आरक्षणासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न आवश्यक आहे. आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक आणि सरकारमधील सामंजस्याने हा प्रश्न सुटू शकतो, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) व्यक्त केले.
मराठा समाजातील उपेक्षित घटकासोबत संपूर्ण समाज उभा आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत सहकार्याने वागावे, असे पाटील म्हणाले. राज्यकर्त्यांच्या धोरणावर टिका करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना घटनेतून देण्यात आला आहे. पंरतु, या मूलभूत अधिकाराचा वापर करीत कुठल्याही लोकनेत्याबद्दल अयोग्य भाषेचा वापर करणे सुसंस्कृत महाराष्ट्रातील वातावरणात शोभनिय नाही, याचे समर्थन होवू शकत नाहीच.पंरतु,सरकारने देखील यावेळी आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, असे पाटील म्हणाले.
राज्य सरकारने मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मान्य करत, शिक्षणामध्ये १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण दिलं गेलं होतं.मात्र, ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार देत, ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. पंरतु, ही पुनर्विचार याचिकाही २१ एप्रिल २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अशात मराठा समाजातील उपेक्षित घटकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने आंदोलकांच्या भावना लक्षात घेवून सकारात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.