Home Uncategorized चंद्रपूरच्या जंगलात’ अभिवाचनाला शिवाजी विद्यापीठात मोठा प्रतिसाद

चंद्रपूरच्या जंगलात’ अभिवाचनाला शिवाजी विद्यापीठात मोठा प्रतिसाद

0 second read
0
0
21

no images were found

चंद्रपूरच्या जंगलात’ अभिवाचनाला शिवाजी विद्यापीठात मोठा प्रतिसाद
कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठाचा बी. ए. फिल्म मेकिंग विभाग आणि ‘एन अनुप जत्राटकर मल्टीमीडिया प्रॉडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चंद्रपूरच्या जंगलात…’ या नाटकाच्या अभिवाचनाला शिवाजी विद्यापीठात मोठा प्रतिसाद मिळाला.
नाट्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘अवकाश’ चे हे सादरीकरण उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. ज्येष्ठ लेखक विक्रम वाटवे यांची कलाकृती रंगमंचावर जिवंत करण्याचे काम सुप्रसिद्ध अभिवाचक समीर दळवी आणि दिग्दर्शक हृदयनाथ जाधव यांनी केले. तासभर सुरू असलेल्या या प्रयोगाने सर्वांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमानंतर दिग्दर्शक हृदयनाथ जाधव आणि समीर दळवी यांच्याशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
स्वागत अनुप जत्राटकर यांनी केले. प्रास्ताविक फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी वाघमोडे हिने केले. आभार प्रवीण पांढरे यांनी मानले. यावेळी इंग्रजी विभागाच्या डॉ. तृप्ती करेकट्टी, सामाजिक वंचितता विभागाचे अविनाश भाले, शरद आजगेकर, डॉ. प्रमोद कसबे, विकास कांबळे, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स क…