नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी निर्माण करून देण्यासाठी नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टल निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात बेरोजगारीचे किती भीषण वास्तव आहे याचा अंदाज पोलिस भरतीतून आला आहे. जवळपास शंभरावर अर्ज एका जागेसाठी अर्ज दाखल झाले आहेत. उच्चशिक्षितही पोलिस शिपाई भरतीच्या रांगेत …