एक्झॉनमोबिल भारतात ल्युब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे मुंबई, महाराष्ट्र – एक्झॉनमोबिल ने सांगितले की ते रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास ९०० कोटी ची गुंतवणूक करत आहे. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीने ही घोषणा केली. एकदा कार्यान्वित झाल्यावर, उत्पादन, पोलाद, उर्जा, खाणकाम आणि बांधकाम, तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक …