
no images were found
भीषण आग 500 हून अधिक दुकानं जळून खाक
कानपूर : कानपूरमधील बांसमंडीतील हमराज कॉम्प्लेक्स कापड बाजारात आग लागल्याची घटना घडली. या मार्केटमधील एआर टॉवरमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या मालाला आग लागल्याचे समजते. एका ठिकणगीनं अख्ख कॉन्मप्लेक्स उद्ध्वस्त केलं. 500 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 50 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. साधारण 8 तासांहून अधिक वेळ ही आग धुमसत होती.
एआर टॉवरपासून सुरू झालेली आग नफीस टॉवर, अर्जुन कॉम्प्लेक्स, मसूद कॉम्प्लेक्स-1 आणि मसूद कॉम्प्लेक्स-2 मध्ये पसरली आहे. या पाच संकुलात ज्वाळा आणि धुराचे लोटही वाढत आहेत. नफीस टॉवरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. या टॉवरलाही आग लागली आहे. या आगीने बँकेलाही वेढले आहे.
या आगीची माहिती मिळताच लष्कर, हवाई दल, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कानपूर, उन्नाव, लखनऊसह जवळपासच्या अनेक जिल्ह्यांतील अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या 500 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती मिळाली नाही. कूलिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे.