Home Uncategorized रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, पाठोपाठ लेकीनेही घेतली उडी अन्…

रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, पाठोपाठ लेकीनेही घेतली उडी अन्…

1 second read
0
0
60

no images were found

रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, पाठोपाठ लेकीनेही घेतली उडी अन्…

धावती रेल्वे पकडण एका महिलेच्या जीवावर बेतता बेतता राहिलं आहे. ही महिला धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल गेला आणि ती रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये पडली.

अकोला: रेल्वे स्थानकात धावती रेल्वे पकडणं एका महिलेच्या जीवावर बेतल असतं. परंतू काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच काहीसं अकोल्याच्या रेल्वे स्थानकात दिसून आलं. रात्री साडे ९ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसोबत मुंबईला जाण्यासाठी चालत्या अमरावती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती.


मुलगी रेल्वेत चढली खरी, पण पाठीमागे असलेल्या आईचा तोल गेल्याने ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे व्हेंडरसह प्रवाशांनी तिला बाहेर ओढलं आणि रेल्वेखाली जाता-जाता महिला थोडक्यात बचावली. तिकडे आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही चालत्या रेल्वेतून उडी घेतली. हा संपूर्ण थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

धावत्या रेल्वेत चढण्याचा अथवा रेल्वेतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात अपघाताच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या. वाशिम येथील बेबी मधुकर खिलारे या तिच्या मुलीसोबत अमरावती एक्सप्रेसने मुंबईला जात होत्या. त्यांना रेल्वे स्थानकात पोहोचायला वेळ झाला, आई आणि मुलगी दोघेही प्लॅटफॉर्मवर आल्या. तेव्हा अमरावती एक्सप्रेस नुकतीच सुटली होती. तेवढ्यात आई आणि मुलीने रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर मुलगी रेल्वे चढली, परंतु रेल्वेत चढत असताना तिच्या आईचा पाय घसरला आणि ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. मात्र, या ठिकाणी असलेल्या रेल्वे व्हेंडर शंकर स्वर्गे आणि इतर प्रवाशांनी लागलीच त्यांना बाहेर ओढलं आणि त्यांचा जीव वाचवला. रेल्वेच्या दरवाज्यातून आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही थोड्या अंतरावर चालत्या रेल्वेतून उडी घेतली. सद्यस्थितीत आई आणि मुलगी दोघीही सुखरुप असून पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, स्वर्हगे यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…