जैन संत आचार्य विद्यासागर जी महाराज यांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिगंबर जैन संप्रदायाचे संत आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे जीवन ज्ञानसाधना, कठोर तपस्या व आत्मकल्याणासाठी समर्पित होते. संस्कृत व प्राकृत भाषांचे गाढे अभ्यासक असलेल्या विद्यासागर जी महाराजांनी प्रवचने, लिखाण तसेच काव्याच्या …