no images were found
जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने करिअर संधीबाबत कार्यशाळा
कोल्हापूर – जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने परदेशातील उच्च शिक्षणाच्या विषयानुसार कोणकोणत्या ठिकाणी संधी उपलब्ध आहेत, पूर्वतयारी, या विषयावर शनिवारी (ता. 17) कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती चेअरमन गिरीश शहा यांनी दिली.
ते म्हणाले, परदेशातील नामांकित विद्यापीठे, पूर्वतयारी, नियोजन कसे करावे, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाबरोबर काही देशांमध्ये आयईलटीएस ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेची पूर्वतयारी कशी केली पाहिजे, याबाबत व्यक्तिगत स्तरावर मार्गदर्शन मिळणार आहे. कोणत्या व्यावसायिक शिक्षणासाठी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर संधी उपलब्ध आहेत, याबाबतही मार्गदर्शन मिळेल. इतकेच नाही तर उच्च शिक्षण घेत असताना शैक्षणिक कर्ज, नोकरी व निवास नियोजन कसे असावे, पदवी पूर्व आणि ग्रॅज्युएशननंतर मास्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी लागणारी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल. यासाठी https://studysmart.co.in/sem-kolhapur-jito या लिंकवर नोंदणी करावी.
हॉटेल रेडिएंट, न्यू शाहूपुरी, येथे शनिवारी, ता. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मोफत होणाऱ्या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री. शहा व चीफ सेक्रेटरी अनिल पाटील यांनी केले आहे.