no images were found
अनियंत्रित कार मुले शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यात उसाची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांचा ऊस हा रस्त्याला लागून आहे. त्यामुळे उसापासून रस विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.शेतातील ताजा ऊस तोडायचा. त्यापासून रस तयार करून विक्री करायचा, असा हा नगदी पैसे मिळवून देणारा व्यवसाय. संतोष शिंदे यांनी उसाची लागवड केली. शेतातच रसवंती व्यवसाय त्यांनी सुरू केला. दुपारची वेळ असल्याने ते घरी गेले होते. थोड्या वेळासाठी मुलाला रसवंतीगृहात बसवले होते. तेवढ्यात अनियंत्रित वेगवान कारमुळे अनर्थ घडला.
पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे भरधाव वेगाने जाणारी मोटारकार जात होती. ती कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे वय 11 असे मृताचे नाव आहे. समर्थ हा खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होता. घटनेनंतर गर्दी जमा झाली. संतोष शिंदे यांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. नेहमी मदतीसाठी येणारं बाळ गेलं होतं. हा अपघात रविवारी दुपारी पावणे एक चा दरम्यान घडला. भिलवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.