Home राजकीय पवार नावाची कीड लागली आहे’; गोपीचंद पडळकर

पवार नावाची कीड लागली आहे’; गोपीचंद पडळकर

0 second read
0
0
88

no images were found

पवार नावाची कीड लागली आहे‘; गोपीचंद पडळकर

इंदापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला.पडळकर यांनी, पवार नावाची कीड लागली आहे. ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल असं म्हटलं आहे. तसेच पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून पवारांवर हल्ला चढवला. पुण्यात यांचीच सत्ता होती. मात्र पुण्याची काय अवस्था आहे? वाहतूक कोंडी होते. मग का काही केलं नाही? नवीन काही करायचं नाही. फक्त आहे त्याची धार काढत बसायची”, असा घणाघात पडळकर यांनी केला.

त्याचवेळी अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात 40 ते 44 गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी देऊ शकले नाहीत असा टोला लगावला. राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आलं नाही अशीही टीका केली. तर पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्याव? ते केंद्रीय कृषी मंत्रीही होते. मात्र राज्यात पैसा आणावा असेही का नाही वाटलं असा सवाल करत टीका केली. जर लोकशाही मजबूत करायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा राहण्याचं आवाहन केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…