no images were found
‘संवादाचे प्रभावी साधन : लोकमाध्यमे’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन विभागातर्फे “संवादाचे प्रभावी साधन:लोकमाध्यमे” या विषयावर दि. ७-८ डिसेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बीजभाषण प्रा. डॉ. नंदकुमार मोरे (प्रमुख, मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ) यांच्या हस्ते होणार आहे. सुनीलकुमार सरनाईक (संपादक, साप्ताहिक करवीर काशी), शाहीर डॉ. राजू राऊत, डॉ.आझाद नायकवडी (संगीत शिक्षक, उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर) या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. ७ डिसेंबर आणि ८ डिसेंबर रोजी सकाळी १२ ते दुपारी साडेतीन या वेळेतजर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या इमारतीमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.कार्यशाळेच्या पहिल्यासत्रात प्रा. डॉ. नंदकुमार मोरे हे “महाराष्ट्रातील लोकमाध्यमे” आणि सुनीलकुमार सरनाईक हे “भजन : संवादाचे साधन” याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात शाहीर डॉ. राजू राऊत हे “शिवकालीन पोवाडे”तर डॉ. आझाद नायकवडी हे “पोवाडा : संवादाचे साधन”या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख आणि कार्यशाळेच्या आयोजक प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले आहे.