
no images were found
शेफ गरिमा अरोरा खरोखर प्रेरणामूर्ती – विकास खन्ना
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव लवकरच आपल्या प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन येत आहे, एक सुग्रास कुकिंग रियालिटी शो, मास्टरशेफ इंडिया. उगवत्या शेफ्सचे पाककौशल्य प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल आणि या शोमध्ये प्रेक्षकांना अशा काही पाककृती बघायला मिळतील, की त्यांच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल! देशाच्या मास्टरशेफचा शोध आता लवकरच्सुरू होणार आहे. हा शोध घेतील परीक्षकांच्या पॅनलवरील प्रख्यात शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा. त्यापैकी विकास खन्ना आणि गरिमा अरोरा हे दोघे अलीकडेच मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. आपली सह-परीक्षक मिशेलिन स्टार शेफ गरिमा अरोरा हिने नुकताच आणखी एक मिशेलिन स्टार जिंकून आपल्या टोक ब्लांच (शेफची पांढरी टोपी)मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला, त्याबद्दल विकास खन्नाने तिचे तोंड भरून कौतुक केले. शेफ गरिमाला मिशेलिन स्टार अवॉर्ड मिळाला आणि त्या पाठोपाठ या शोचा प्रोमो रिलीज झाला. त्यामुळे या प्रोमोने लोकांचे लक्ष साहजिकच वेधले आणि अनेक कुतुहलाने भरलेल्या नजरा शोकडे वळल्या.
शेफ गरिमा अरोराचे कौतुक करताना शेफ विकास खन्ना म्हणाला, “गरिमाने जे यश मिळवले आहे ते शेफ्सना आणि विशेष करून महिलांना क्वचितच मिळते. गरिमाचे यश दर्शविते की, तिच्या कष्टांचे चीज झाले आहे. तिचा पहिल्यापासून स्वतःवर दृढ विश्वास होता आणि आपल्या स्वप्नांचा तिने जिद्दीने पाठपुरावा केला. तिच्यासाठी अन्न म्हणजे एक कला आहे. त्यामुळे ती जगासमोर जेव्हा एखादी डिश ठेवते, तेव्हा जणू ती स्वतःला अभिव्यक्त करत असते, आपली सर्जनशीलता दाखवत असते. मला खूप आनंद वाटतो की, तिने यशाची शिडी चढून हा गौरव मिळवला आहे. सर्व उगवत्या शेफ्ससाठी, कुकिंगचा ध्यास असलेल्या होम शेफ्ससाठी, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, गरिमा प्रेरणामूर्ती आहे. ‘पॅशन से पहचान’ यावर आम्हा सर्वांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आम्ही आणखी अशा काही लोकांच्या शोधात आहोत, ज्यांच्यात कुकिंगची आवड आणि सर्जनशील पाक-कौशल्याबरोबरच पॅशनची ती ठिणगी देखील आहे.आपले मित्र त्यांच्या क्षेत्रात अशा प्रकारे यशस्वी झाले, जगभरात झळकले की आनंद वाटतो. गरिमा आत्ता खचितच यशाच्या झोतात आहे!”