Home शासकीय जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

35 second read
0
0
38

no images were found

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

ग्रंथदिंडी, कविसंमेलन, काव्य नाट्यानुभव, व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

* साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक 9 व 10  डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव 2022 जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

ग्रंथोत्सव 2022 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दिनांक 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या ग्रंथोत्सवात शुक्रवार, दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरुन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे येईल. यात अनेक मान्यवर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमींचा सहभाग असणार आहे. या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने होणार आहे.

दुपारी 3 वाजता कविवर्य पाटलोबा पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली “कविसंमेलन” होणार असून या कविसंमेलनामध्ये चंद्रकांत पोतदार, निलेश शेळके, अनिल महाजन, सचिन इनामदार, दिनकर खाडे, मंदार पाटील, विष्णु पावले, विक्रम राजवर्धन, आनंद रंगराज, सुप्रिया आवारे, संजय थोरात, भिमराव पाटील, आनंदा शिंदे, राजेंद्र कोळेकर, सतीश तांदळे आदिंचा सहभाग राहणार असून सुनंदा शेळके सूत्रसंचालन करणार आहेत.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता “कुटुंब रंगलंय काव्यात” हा विसुभाऊ बापट यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी 3 वाजता शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली “ऐकाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते थिंक बँक लाईव्ह (मराठीतील प्रसिद्ध युट्युब चॅनेल) चे संपादक विनायक पाचलग असणार आहेत.

दुपारी 4 वाजता ग्रंथोत्सव सोहळ्याचा समारोप सभारंभ ज्येष्ठ लेखिका श्रीमती सुमित्रा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. पांडुरंग सारंग  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शाहीर आझाद नायकवडी यांच्या शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

ग्रंथोत्सवात दि. 9 व 10 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार असून यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव 2022 जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…