no images were found
दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे 2,80,290 लाभार्थ्यांना फायदा होणार
दिल्ली :- अंत्योदय अन्न योजना प्रवर्गातील कार्डधारकांना साखर अनुदान योजनेंतर्गत मोफत साखर वाटपाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता, त्याला राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 68,747 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्डधारकांसह सुमारे 2,80,290 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अंदाजे 1.11 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता असेल.
सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाईमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन दिल्ली सरकारने कोणालाही अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये यासाठी उपाययोजना केल्या होत्या. या प्रयत्नांतर्गत, एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत PDS लाभार्थ्यांना NFSA रेशन मोफत वाटण्यात आले. त्यानंतर ते मे 2021 ते मे 20222 पर्यंत वाढविण्यात आले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सर्व NFSA लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या गहू, तांदूळ व्यतिरिक्त, दिल्ली सरकारने मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या (AAY) लाभार्थ्यांना साखर अनुदान योजनेअंतर्गत दिल्ली सरकार मोफत साखर पुरवणार आहे. AAY कार्डधारकांना जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या एका वर्षाच्या कालावधीसाठी साखर मोफत वाटली जाईल.
सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाईमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन दिल्ली सरकारने कोणालाही अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये यासाठी उपाययोजना केल्या होत्या. या प्रयत्नांतर्गत, एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत PDS लाभार्थ्यांना NFSA रेशन मोफत वाटण्यात आले. त्यानंतर ते मे 2021 ते मे 2022 पर्यंत वाढविण्यात आले.
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील गरीब कुटुंबांना मोफत साखर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली मंत्रिमंडळाने गुरुवारी (20 जुलै) दिल्लीकरांना मोफत साखर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गरीब कुटुंबांना येणाऱ्या अडचणी कमी करणे आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा सरकारच्या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे.