no images were found
मला प्रचंड राग आलाय; दोषींना सोडणार नाही; मोदीं
मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावरून फिरवलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझं मन प्रचंड दुःखी झालंय. तसंच या घटनेमुळं प्रचंड राग आला आहे. कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही, अशा शब्दांत मोदींनी संताप व्यक्त केला.
मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना लज्जास्पद आहे. माझं मन दुःखी झालंय असं सांगतानाच पंतप्रधान मोदी भावुक झाले. गुन्हेगारांना सोडणार नाही. दोषींना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.