no images were found
हिजाबविरोधी आंदोलनाला यश ; इराणमधील ‘मोरॅलिटी पोलीस’ दल अखेर बरखास्त
तेहरान : इराणमधील मोरॅलिटी पोलिस दल अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. देशामध्ये इस्लामिक पद्धतीच्या ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेलं हे दल बरखास्त करण्यात आल्याची माहिती इराणच्या अॅटर्नी जनरल यांनी दिली आहे.
मोहम्मद जफर मुन्तझरी यांनी रविवारी एका कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याला अजून अन्य सरकारी संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाहीये. पोलिस कस्टडीमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये या मोरॅलिटी पोलिसांविरूद्ध काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हिजाबसंबंधीचे नियम मोडल्याबद्दल मोरॅलिटी पोलिसांनी महसा अमिनी या तरूणीला ताब्यात घेतलं होतं. मोहम्मद जफर मुन्तझरी यांना एका धार्मिक कार्यक्रमात मोरॅलिटी पोलिस दलाच्या बरखास्तीबद्दल विचारण्यात आलं.
त्यावेळी त्यांनी म्हटलं की, “मोरॅलिटी पोलिसांचा न्याय व्यवस्थेशी काहीही संबंध नाही. जिथून त्यांची सुरूवात झाली, तिथूनच ते बंद होत आहे.”या पोलिस दलाचं नियंत्रण हे न्यायपालिकेकडून नसून गृह मंत्रालयाकडे आहे. इराणी महिलांना हिजाब घालणं अनिवार्य करणारा कायद्याचा पुनर्विचार करणं गरजेचं असल्याचं मुन्तझरी यांनी शनिवारी म्हटलं होतं.मोरॅलिटी पोलिस दल बरखास्त झालं असलं तरी याचा अर्थ इराणमधील अनेक दशकांपासून चालत आलेले कायदे बदलतील असा नाहीये