Home क्राईम ड्रममध्ये आढळले मृतदेहाचे अनेक तुकडे; श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण

ड्रममध्ये आढळले मृतदेहाचे अनेक तुकडे; श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण

0 second read
0
0
104

no images were found

ड्रममध्ये आढळले मृतदेहाचे अनेक तुकडे; श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण

 विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये एका बंद असलेल्या खोलीत एक ड्रम आढळून आला. त्यात एका महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. हा मृतदेह वर्षभराहून अधिक कालावधीपासून तिथे पडून असावा असा संशय पोलिसांना आहे. अलताफने श्रद्धा वालकरची हत्या केल्याचे प्रकरण चर्चेचा विषय ठरत असताना अशाच प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

घरात वास्तव्यास असलेल्यांनी अनेक महिने भाडं दिलेलं नव्हतं. त्यामुळे घरमालकानं दरवाजा तोडला. तेव्हा घरातील एका ड्रममध्ये त्याला महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले. विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये हा प्रकार उघडकीस आला. भाडेकरू काही महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला. त्याचं सामान घरातून बाहेर फेकून देण्यासाठी मालक घरी पोहोचला. तेव्हा त्याला ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले.

पत्नी गर्भवती असल्याचं सांगून भाडेकरूनं जून २०२१ मध्ये घर सोडलं. त्यानं घराचं भाडं थकवलं होतं. घर सोडल्यानंतरही भाडेकरू एकदा मागच्या दरवाज्यानं घरात शिरला होता. मात्र त्यानं आतापर्यंत घरमालकाला भाडं दिलेलं नाही. एक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर घरमालक भाडेकरुचं सामान घराबाहेर काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला ड्रममध्ये महिलेचे अवयव सापडले.व

र्षभरापूर्वी मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिली. हा मृतदेह भाडेकरूच्या पत्नीचा असू शकतो, अशी शक्यता विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त श्रीकांत यांनी बोलून दाखवली. या प्रकरणी घरमालकाच्या तक्रारीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…