Home मनोरंजन  ‘दे धक्का २’  मराठी चित्रपट ५ ऑगस्ट रोजी होतोय प्रदर्शित

 ‘दे धक्का २’  मराठी चित्रपट ५ ऑगस्ट रोजी होतोय प्रदर्शित

1 second read
0
0
84

no images were found

 ‘दे धक्का २’  मराठी चित्रपट ५ ऑगस्ट रोजी होतोय प्रदर्शित
कोल्हापूर : अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत  ‘दे धक्का २’  हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२  रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .
सुपरहिट ‘दे धक्का ‘ २००८ साली प्रदर्शित झाला होता. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील मुंबईपर्यंतच्या प्रवासाविषयी होता.
आता दे धक्का २ मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे. या कुटुंबाचा प्रवास लंडन पर्यंतचा आहे. आणि कथानकही लंडनमध्येच  घडते. या चित्रपटात जुन्या टिम बरोबरच स्वतः महेश मांजरेकर यांचेसह गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आनंद इंगळे यांच्याही भूमिका आहेत.  ‘दे धक्का २’ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे.
संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे.
दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…