Home Video डीकेटीईच्या ’प्राचीन गरबा’ लोकनृत्याला युवामहोत्सवात द्वितीय क्रमांक

डीकेटीईच्या ’प्राचीन गरबा’ लोकनृत्याला युवामहोत्सवात द्वितीय क्रमांक

8 second read
0
0
7

no images were found

डीकेटीईच्या ’प्राचीन गरबा’ लोकनृत्याला युवामहोत्सवात द्वितीय क्रमांक

इचलकरंजी (प्रतिनिधी):-शिवाजीविद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनींनी ’प्राचीन गरबा’ हे पारंपारिक लोकनृत्य सादर करुन द्वितीय क्रमांक पटकावला. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा युवा महोत्सव फलटण येथे पार पडला.

या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ३ जिल्हयातील विजयी १५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. गुजरातच्या समृध्द लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणा-या ’प्राचीन गरबा’ या लोकनृत्याचे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी रंगतदार आणि बहारदार सादरीकरण केले. पारंपारिक वेशभूषा, तालबध्द नृत्य आणि आकर्षक सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी संघात भक्ती सोनटक्के, अदिती फरकाटे, वैष्णवी खोत, श्रावणी कोहळे, रितीका पवार, प्रिती संकपाळ, भाग्यश्री वाघ व प्रणाली पोतदार या विद्यार्थींनींचा सहभाग होता.

यश प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांनींना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल विभागाचे डॉ ए.आर.बलवान, प्रा. जे.एस. रॉड्रीक्स, प्रा.एच.एस. दायमा यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमि…