Home Uncategorized युट्युबर ध्रुव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

युट्युबर ध्रुव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

18 second read
0
0
20

no images were found

युट्युबर ध्रुव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

        नवी दिल्ली : युट्युबर ध्रुव राठी याने प्रसारित केलेल्या “हिंदू बीफ खातात का?” (“Can Hindus Eat Beef?”) या वादग्रस्त व्हिडिओच्या माध्यमातून सनातन हिंदु धर्म, हिंदु धर्मग्रंथ तसेच प्रभू श्रीराम, माता सीता आणि भगवान श्रीकृष्ण यांचा गंभीर विडंबन व अपमान करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे संतानीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे माननीय दिल्ली उच्च न्यायालयानेही स्पष्टपणे मान्य केले आहे. न्यायालयाच्या याच महत्त्वाच्या निर्देशानुसार दिल्ली या प्रकरणाबाबत ‘अक्शन टेकन रिपोर्ट’ (ATR) सादर करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. याशिवाय, भारत सरकारच्या ग्रीव्हन्स कमिटीच्या (GAC) निर्देशानंतर हा आक्षेपार्ह व्हिडिओ युट्यूबवरून (YouTube) भारतातून हटवण्यातही आला आहे.

      या गंभीर प्रकरणाची दखल घेत हिंदु जनजागृती समितीने दिल्ली पोलिसांच्या आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. ध्रुव राठी भारतात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोषी ध्रुव राठीवर तात्काळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा, त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.

     याशिवाय समितीने ध्रुव राठीच्या “केराला स्टोरी २ एक्सपोज” (“Kerala Story 2 Exposed”) या आणखी एका वादग्रस्त व्हिडिओचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात दुही माजवणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे आक्षेप घेण्यात आले आहेत. यावर प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असे समितीचे म्हणणे आहे.

     हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी स्पष्ट केले की, “धार्मिक श्रद्धा आणि सनातन संस्कृतीच्या आराध्य दैवतंचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…