Home सामाजिक श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी 

श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी 

4 second read
0
0
52

no images were found

श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी 

मुंबई : श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना सदर ठिकाणी अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून जाणाऱ्या भाविकांना हमखास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सदर ठिकाणी देशातील अन्य राज्यांचे निवासभवन/ भक्तनिवास स्थापन करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री तिरुपती बालाजी दर्शन पास, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अवर मुख्य सचिवांना दिल्या आहेत. 

     या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, आंध्रप्रदेश राज्यातील तिरुमला येथील श्री तिरुपती बालाजी मंदिर हे प्रसिद्ध हिंदू मंदिर असून, या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक दरवर्षी जातात. श्री तिरुपती बालाजी मंदिरास भेट देणारे लाखो भाविक कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यास येतात. ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश दोन्ही राज्यासह संपूर्ण देशभरातील भाविकांचे धार्मिक श्रद्धास्थान आहेत. श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना सदर ठिकाणी अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होवून श्री तिरुपती बालाजीचे दर्शन पास सुविधा, निवासव्यवस्था, पर्यटन माहिती देणारे महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन होणे आवश्यक आहे. तशी मागणीही भाविकांमधून गेली अनेक वर्षे होत आहे. याकरिता राज्य शासनामार्फत आंध्रप्रदेश राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून श्री तिरुपती बालाजी, आंध्रप्रदेश येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र सदन स्थापन करणेबाबत शासन स्तरावरून आंध्रप्रदेश शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…