Home शैक्षणिक कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

14 second read
0
3
191

no images were found

 

कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

 सांगली (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या  कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मुटकुळे, आचार्य अकॅडमी बारामती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सक्सेस अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचाहि सत्कार याठिकाणी करण्यात आला. 

      विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सक्सेस अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना पहिल्यापासून प्रशिक्षित करण्यात या शिक्षणसंस्थेचा भर राहिला आहे. सतत सराव, परीक्षा व सखोल अभ्यास अशा बाबींवर लक्ष दिल्यामुळे येथील विद्यार्थी विविध परीक्षेत यश संपादित करत असल्याचे सक्सेस अकॅडमीचे प्रमुख वर्धमान बुद्रुक यांनी सांगितले. कु. सर्वेशा शेळके हिच्या या यशामागे   सक्सेस अकॅडमीच्या  प्रतिभा बुद्रुक, भरत बोरगे, सारिका बोरगे व प्राचार्य सुरेश मगदूम, स्वप्नाली मगदूम, प्रा. सुधीर मगदूम  यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

       शिराळ्यातील डोंगरी भागात असणाऱ्या सक्सेस अकॅडमीने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात लौकिक प्राप्त केला आहे.सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करणात आली. यावेळी स्पर्धा परीक्षा, दहावी, शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विधीज्ञ नेहा सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा साधना पाटील यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …