no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव, कोल्हापूर येथील Career Development Cell यांच्या वतीने डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी “cGMP: Then and Now” या विषयावर विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) आणि इंडियन ड्रग मॅनुफॅक्टरर्स असोसिएशन (IDMA) यांच्या वतीने पिढीला फार्मसी औद्योगिक क्षेत्रातील नवीन
regulations आणि गाईडलाईन्स माहिती व्हाव्यात यासाठी २०२३ साला पासून दरवर्षी १० ऑक्टोबर हा राष्ट्रीय cGMP दिवस म्हणून साजरा करण्यात यावा हे धोरण राबवले आहे. याचा उद्देश फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी औद्योगिक क्षेत्रातील अत्यंत महत्वाचे कायद्या बद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या सेमिनारसाठी कोल्हापूर मधील अग्रगण्य अश्या फाईव्ह-स्टार MIDC स्थित Ripcord Pharmaceuticals Limited संस्थेच्या सौ. प्राजक्ता अ. पाटील (General Manager) हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी उद्योग क्षेत्रातील विविध गाईडलाईन्स आणि धोरणांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. झकी हुसेन तांबोळी, प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा. ऋतुराज देसाई व प्रा. रोहिणी कोंडुसकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची माहिती आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले.