Home सामाजिक महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

0 second read
0
0
9

no images were found

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कामे तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गंत सुरू आहेत.येत्या 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे.तत्पूर्वी पुरातत्त्व विभागाने मंदिराचा मूळ ढाचा सांभाळत तेथील विकासकामे वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले.महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गंत आज शाहूजी सभागृहात आढावा बैठक पार पडली.
ते म्हणाले, मंदिर दुरुस्तीच्या अंगाने पुरातत्व विभागाने तांत्रिक बाबींची बिनचूक दुरुस्ती करावी तसेच हे मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय न होता 11 तारखेपर्यंत अडथळा विरहीत खुले राहील यासाठी मंदिर समिती व पुरातत्व विभागाने प्रयत्न करावेत. ही दुरुस्ती होत असताना विशेषतः वायरिंग बाबत दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मनकर्णिका कुंडावर नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने एकाद्या दिवशी दीपोत्सव साजरा करता येईल का ? याची चाचपणी मंदिर समितीने करावी अशी अपेक्षाही त्यांनी या बैठकीत व्यक्त केली .
आगामी दोन दिवसात सीसीटीव्हीचे कामकाज पूर्ण होईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी तर मनकर्णिका कुंडाचे व मंदिरातील फरशीचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी दिली.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीच्या सचिव श्रीमती वर्षा साळुंखे,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मस्के,शहर अभियंता(मनपा)रमेश मस्कर, भूमी संपादन विशेष अधिकारी प्रियंका धनवडे,महावितरणचे कार्य.अभियंता संदीप पाटील, सार्व.बांधकाम विभागाचे कार्य अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी – कंत्राटदार आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन कोल्हाप…