Home मनोरंजन “महिलांच्या आरोग्याविषयी अधिक मोकळेपणाने चर्चा होणं आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे,”: गुलकी जोशी 

“महिलांच्या आरोग्याविषयी अधिक मोकळेपणाने चर्चा होणं आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे,”: गुलकी जोशी 

4 second read
0
0
6

no images were found

“महिलांच्या आरोग्याविषयी अधिक मोकळेपणाने चर्चा होणं आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे,”: गुलकी जोशी 

सोनी सबवरील यादें ही मालिका आपल्या वैद्यकीय नाटकात विनोद, भावना आणि दैनंदिन आयुष्याशी जोडलेली कथानकं हलक्याफुलक्या पद्धतीने सादर करत आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर, ही मालिका महिलांच्या सामर्थ्याचा आणि जिद्दीचा गौरव करणारा एक विशेष ट्रॅक घेऊन येत आहे, ज्यामध्ये डॉ. सृष्टी (गुलकी जोशी) किलारी गावातील महिलांना अनेक वर्षांपासून दुर्लक्षित कराव्या लागलेल्या एका महत्त्वाच्या समस्येबाबत पुढाकार घेताना दिसणार आहे.

 

जेव्हा एक महिला डॉ. सृष्टींकडे आपल्या आरोग्याशी संबंधित समस्येसह येते, पण त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यास संकोच करते, तेव्हा सृष्टीला जाणवतं की लाज आणि सामाजिक कलंकामुळे महिलांच्या आरोग्याविषयीच्या अगदी मूलभूत चर्चाही गावात कठीण बनल्या आहेत. हा दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करून, डॉ. सृष्टी किलारीतील महिलांशी मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता आणि गरज भासल्यास वैद्यकीय मदत घेण्याचं महत्त्व याविषयी संवाद साधण्याची जबाबदारी स्वतःवर घेतात. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना गावकऱ्यांकडून विरोध होतो, कारण वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजुतींना आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांना अस्वस्थ करतो. या सगळ्या प्रवासात डॉ. देव (इक़बाल खान) त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि किलारीतील महिलांसाठी अधिक मोकळं आणि जागरूक वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देतात.

 

डॉ. सृष्टी महिलांच्या आरोग्याविषयी असलेला सामाजिक कलंक दूर करून किलारीतील महिलांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यशस्वी होणार का?

     आगामी ट्रॅकबद्दल बोलताना, गुलकी जोशी म्हणाल्या, “महिलांच्या आरोग्याविषयी अधिक मोकळेपणाने चर्चा होणं आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या कथेत मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे एखाद्या महिलेनं स्वतःच्या आरोग्याबद्दल बोलणंही गावात लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. डॉ. सृष्टीला या महिलांनी हे समजून घ्यावं असं वाटतं की त्यांच्या आरोग्याबद्दल लाज वाटण्यासारखं काहीच नाही आणि गरज भासल्यास वैद्यकीय मदत घेणं पूर्णपणे सामान्य आहे. गावकरी तिच्या विरोधात गेले तरी ती मागे हटत नाही, ही गोष्ट मला खूप आवडते. या प्रवासात डॉ. देव तिच्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे तिचा हा प्रवास आणखी खास बनतो. मला आशा आहे की हा ट्रॅक महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि स्वतःला प्राधान्य देताना त्यांनी कधीही अपराधी किंवा लाजिरवाणं वाटून घेऊ नये, याची जाणीव करून देईल.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

वाढत्या महागाईच्या जोखमीदरम्यान आरबीआय ने व्याजदरवाढीचे चक्र सुरू केले: साक्षी गुप्ता, प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट, एचडीएफसी बँक

वाढत्या महागाईच्या जोखमीदरम्यान आरबीआय ने व्याजदरवाढीचे चक्र सुरू केले: साक्षी गुप्ता, प्र…