no images were found
“गुडघ्यांपर्यंतचे लांब केस, दागदागिने आणि प्रत्येक बारकावा मला खऱ्या अर्थाने राजाची भूमिका साकारत असल्याची जाणीव करून देतात,”: आभास मेहता
सोनी सबची हस्तिनापुर के वीर मालिका आपल्या बारकाईने घडवलेल्या पात्रांमुळे आणि भव्य दृश्य मांडणीमुळे हस्तिनापुरचं जग जिवंत ठेवत आहे. मालिकेत जरासंधची दमदार भूमिका साकारणारे आभास मेहता यांनी त्यांच्या विस्तृत लूकशी संबंधित आव्हानांबद्दल, विशेषतः गुडघ्यांपर्यंत लांब असलेल्या केसांबद्दल आणि त्यामुळे त्यांना पात्रात शिरण्यास कशी मदत होते याबद्दल सांगितलं.
जरासंधचा लूक आभासला पात्राशी अधिक घट्टपणे जोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे लांब केस असोत किंवा छातीवर परिधान केलेले दागदागिने, प्रत्येक घटक या पात्राच्या भव्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वात भर घालतो. आभाससाठी हा लूक केवळ बाह्य स्वरूपापुरता मर्यादित नसून, जरासंधमध्ये पूर्णपणे समरस होण्याच्या त्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आपल्या लूकबद्दल बोलताना आभास मेहता म्हणाले, “जरासंधचा लूक मला पात्रात शिरण्यासाठी खूप मदत करतो. तयार व्हायला साधारण दीड तास लागतो आणि प्रत्येक बारकावा योग्य असल्याची खात्री करण्यासाठी मेकअप आणि वेशभूषा टीम दिवसभर मेहनत घेत असते. गुडघ्यांपर्यंतचे लांब केस, दागदागिने आणि प्रत्येक बारकावा मला खऱ्या अर्थाने राजाची भूमिका साकारत असल्याची जाणीव करून देतात. जेव्हा मी पूर्णपणे तयार होऊन स्वतःकडे आरशात पाहतो, तेव्हा मला आभास दिसत नाही, तर जरासंध दिसतो. हा लूक मला माझं दैनंदिन आयुष्य मागे सोडून पूर्णपणे त्या पात्रात समरस होण्यास मदत करतो.”