no images were found
महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या श्री दुर्गा दर्शन बस सेवेचा शुभारंभ.
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भाविक प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 11/10/2026 ते 19/10/2026 या कालावधीत “श्री दुर्गा दर्शन बस सेवा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर बस सेवेच्या आगाऊ आरक्षण तिकीट विक्रीचा शुभारंभ दिनांक 09/10/2026 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे.
भाविक प्रवाशांनी श्री शाहू मैदान नियंत्रण केंद्र येथून या बस सेवेचा लाभ घ्यावा.
श्री दुर्गा दर्शन बस सेवेचे तिकीट दर पुढीलप्रमाणे राहतील:
पूर्ण आकाराचे तिकीट – रु. 210/-
अर्ध आकाराचे तिकीट – रु. 105/-
तरी जास्तीत जास्त भाविक प्रवासी नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.