Home Uncategorized सहकाराचा अभ्यास करा, संस्थांचे सभासद व्हा: संजय पाचपोर

सहकाराचा अभ्यास करा, संस्थांचे सभासद व्हा: संजय पाचपोर

2 second read
0
0
5

no images were found

सहकाराचा अभ्यास करा, संस्थांचे सभासद व्हा: संजय पाचपोर

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : सहकाराचा अभ्यास करून प्रत्येकाने किमान एका सहकारी संस्थेचा सभासद व्हावे. बदलत्या काळात सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले.

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, अर्थशास्त्र विभाग, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि एमबीए विभागातर्फे ‘सहकाराद्वारे सर्वसमावेशक शाश्वत विकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते काल (दि. ५) बोलत होते. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, अधिसभा सदस्य संजय परमणे तसेच विविध सहकारी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाचपोर म्हणाले, सहकारामध्ये प्रचंड ताकद असून त्यातून गावाचा विकास, रोजगारनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती साधता येते. सहकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भरता निर्माण होऊ शकते. सहकाराचे स्वरूप आणि कार्यपद्धती समजून घेतल्यास माणसाचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधता येतो. सहकारी संस्था चालविणाऱ्या संचालक मंडळाला कोणतेही मानधन मिळत नाही. त्याग आणि सेवाभावातून सहकाराची चळवळ पुढे जाते. गोकुळ, अमूल आणि इफ्को यांसारख्या संस्था शाश्वत विकासाची उत्तम उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू  डॉ. राजनीश कामत यांनी सहकार क्षेत्र हे सर्वसमावेशक विकासाचे एक सिद्ध झालेले मॉडेल असलेचे नमूद केले. त्यांनी यशस्वी सहकारी व्यवस्था ही संस्कार व मानवी मूल्यावर आधारित आहे, या लक्ष्मणराव इनामदार यांच्या विचाराची आठवण करून दिली.  ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची शक्ती सहकारामध्ये असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारामध्ये नवीन संस्था उद्यास येत असून त्याद्वारे कार्यक्षमता वाढत असलेचे मतही व्यक्त केले.केंद्राचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शामल पवार यांनी आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सुनील मोदी यांचा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज

सुनील मोदी यांचा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज कोल्हापूर(प…