no images were found
कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रणाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती
कोल्हापूर, : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका सुरवसे, माने तसेच एनपीपीसीडी कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.