no images were found
‘मैं हूँ साथ तेरे’ साठी सज्ज होताना आपला वडिल बनण्याचा प्रवास करण वोहरा करत आहे शेअर
झी टीव्हीवरील आगामी मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ ही प्रेक्षकांना जान्वी (उल्का गुप्ता) ह्या एका सिंगल आईच्या आयुष्यप्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे एक आई म्हणून आपली जबाबदारी निभावताना तिला वडिलांच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. ह्या मालिकेत जान्वी आपला मुलगा किआन (निहान जैन) सोबत राहते आणि तोच तिचे विश्व आहे. त्यांचे नाते अतिशय दृढ असले तरी घरामध्ये एका पुरूषाची कमी किआनला जाणवते, पण ते त्याच्या स्वतःसाठी नाही तर त्याच्या आईच्या दृष्टीने. जेव्हा जान्वीची ओळख एका समृद्ध व्यावसायिक आर्यमनसोबत होते तेव्हा ह्या कथेमध्ये आणखी रंगत येईल. ते दोघे एकाच छताखाली एकत्र काम करतात. आर्यमन किआनचे मन जिंकण्यासाठी प्रयत्नशी असून वडिलांची भूमिका पुन्हा एकदा बजावण्यासाठी करण उत्साहात आहे.
मागच्या वर्षी करण पिता बनला आणि आपल्या आयुष्यातील ह्या नवीन पर्वाबद्दल तो अतिशय उत्साहात आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला लगेचच आर्यमनची भूमिका मिळाली, ज्यामुळे ऑनस्क्रीनसुद्धा त्याला वडिलांची भूमिका साकारता येणार आहे. प्रत्येक अभिनेत्याची तयारी करण्याची आपली अशी एक पद्धत असते, पण करणच्या मते त्याचा खासगी अनुभव त्याला एका लहान मुलासोबत चित्रीकरण करण्यास मदत करत आहे. करणसाठी हा प्रवास अतिशय भावुक करणारा आहे कारण त्याची मुले दिल्लीला असतात आणि तो मुंबईत काम करतो, पण छोटा निहान आपला सहकलाकार असल्याबद्दल करण स्वतःला भाग्यवान समजतो.
करण वोहरा म्हणाला, “आम्हांला गेल्या वर्षी दोन जुळे मुलगे झाले आणि एक वडिल बनण्याच्या अनुभवापेक्षा समाधानकारक आणखी काहीही नाही़. माझी मुले आणि पत्नी दिल्लीला राहतात तर मी चित्रीकरणामुळे मुंबईत असतो. मला त्यांची फार आठवण येते त्यामुळे जेव्हा कधी मला वेळ मिळतो मी त्यांना भेटायला जातो. ‘मैं हूँ साथ तेरे’ जेव्हा मी स्वीकारली तेव्हा मी एका मुलासाठी त्याच्या वडिलांच्या जागी असलेल्या पुरूषाची भूमिका निभावणार असल्याचे मला कळले आणि ऑनस्क्रीनसुद्धा अशा ह्या संधीसाठी मी उत्सुक होतो.”
तो पुढे म्हणाला, “निहान अतिशय मेहनती मुलगा आहे आणि आमची लगेचच दोस्ती झाली. तो मला माझ्या मुलासारखाच असून जेव्हा माझी मुले त्याच्या वयाची असतील, तेव्हा मी त्यांच्यासोबत जसा वागेन तसाच मी चित्रीकरण करताना निहानसोबत वागतो. ऑफस्क्रीन मी त्याच्यासोबत खेळतो, मस्ती करतो त्यामुळे आमच्या ऑनस्क्रीन दृश्यांमध्येसुद्धा आम्हांला मदतच होईल. त्याला प्रश्न विचारायला फार आवडतात आणि मला त्याला उत्तरे द्यायला आणि शिकवायला आवडते. माझी मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्यासाठी एक चांगला पिता बनण्यासाठी मला याची मदतच होईल.”
मालिकेमध्ये निहानसाठी त्याच्या वडिलांच्या जागी असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी करण अतिशय उत्साहात असून प्रेम़ आयुष्य आणि नातेसंबंधांकडे निरागस दृष्टीने पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल.