
no images were found
संभाजीराजेंच्या संघटनेने पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले
पुणेः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सध्या राज्यभरात निषेध होतोय.एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले.
एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, राजभवन येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्यपाल भगत सिंह कोषयारी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्यपाल कोश्यारी यांचा यशदा या ठिकाणी एक कार्यक्रम आहे.