Home Uncategorized ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेतर्फे१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेतर्फे१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम

5 min read
0
0
7

no images were found

स्वच्छता ही सेवा२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेतर्फे१७ सप्टेंबर ते  ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम

स्वच्छताजनजागृतीजनभागीदारीसह सफाईमित्रांच्या सुरक्षा  सन्मानावर भर

कोल्हापूर, : ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ (SHS-2026) अभियानांतर्गत दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात विविध स्वच्छता, जनजागृती, सामाजिक सहभाग तसेच सफाईमित्रांच्या सुरक्षा व सन्मानाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

            या अभियानांतर्गत शहरातील Cleanliness Target Units (CTUs), Garbage Vulnerable Points (GVPs) तसेच विविध सार्वजनिक ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र–युवा सहभाग’, ‘सफाईमित्र सुरक्षा एवं सन्मान शिबिर’ आणि स्वच्छतेसाठी जनभागीदारी अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. नागरिकांसह शैक्षणिक संस्था, युवक, स्वयंसेवी संस्था, बचत गट, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था व विविध शासकीय विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

शाळामहाविद्यालयांत स्वच्छता जनजागृती

            शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये SWM Rules, 2026 तसेच 4-Way Waste Segregation बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच RRR – Reduce, Reuse & Recycle उपक्रमांतर्गत पुनर्वापर व पुनर्चक्रणासाठी विविध वस्तूंचे संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच चित्रकला व भित्तीचित्र स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

GVP  CTU ठिकाणांचे होणार रूपांतर

            GVP व CTU Transformation अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून साचलेला कचरा हटविणे, परिसर स्वच्छ करणे तसेच सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. नागरिक व सामाजिक संस्थांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. बाजारपेठा, रस्ते, बसस्थानके, शाळा-महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच नद्या, घाट, तलाव व नाले या ठिकाणी ‘Clean Public Places’ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

घरोघरी कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन

            ‘घरोघरी SWM Rules 2026’ या उपक्रमातून नागरिकांना कचरा वर्गीकरण, Home Composting, Single Use Plastic बंदी, कापडी पिशव्यांचा वापर तसेच Reduce–Reuse–Recycle याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय ‘Sports for Swachhata’, ‘Zero Waste’ क्रीडा स्पर्धा, गणेश विसर्जनानंतर घाट व परिसराची स्वच्छता, निर्माल्य व फुलांच्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, पर्यटनस्थळांवर स्वच्छता जनजागृती, प्लास्टिक बंदी आणि BWG–Recycler Connect यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सफाई मित्रांच्या सुरक्षा  सन्मानाला प्राधान्य

            ‘सफाईमित्र सुरक्षा एवं सन्मान शिबिरा’च्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य, आरोग्यविषयक सुविधा तसेच आयुष्मान भारत व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच PPE/Safety Gearचे वितरण करून सफाईमित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 ऑक्टोबरला ‘एक दिवसएक तासएक साथ

            दि. १ ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमांतर्गत नागरिक, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्था व विद्यार्थ्यांच्या सहभागातून सार्वजनिक ठिकाणी श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गांधी मैदान, कोटीतीर्थ तलाव आणि राजाराम बंधारा आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

            या अभियानाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या संकल्पनेतून शहरातील विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

            कोल्हापूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी व कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनी ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेच्या या लोकचळवळीत योगदान द्यावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २…