Home संशोधन ‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा -डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन

‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा -डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन

10 second read
0
0
7

no images were found

‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा -डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहन -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंगमध्ये विद्यार्थी शाखेचा शुभारंभ

कोल्हापूर(प्रतिनिधी):- तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर भर द्यावा. इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन तांत्रिक व व्यावसायिक क्षमता विकसित कराव्यात, असे आवाहन आय-ट्रिपल-ईच्या महाराष्ट्र विभागाचे सचिव डॉ. चाणक्य कुमार झा यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोल्हापूर येथील संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागातर्फे आय-ट्रिपल-ई विद्यार्थी शाखा शुभारंभ समारंभात ते बोलत होते.

डॉ. झा यांनी तंत्रज्ञानातील बदलते प्रवाह, संशोधन, नवकल्पना आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांनी सतत अद्ययावत राहण्याचे आवाहन केले. आय-ट्रिपल-ईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद, तांत्रिक उपक्रम, संशोधनाच्या संधी, प्रकल्प तसेच व्यावसायिक नेटवर्किंगचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा होते. विद्यार्थ्यांनी आय-ट्रिपल-ईच्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची दृष्टी विकसित करून तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ पदवी मिळविण्यापेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक उपक्रम, प्रकल्प आणि संशोधनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी कॅपजेमिनीचे सिनिअर अँड्रॉइड डेव्हलपर किशोर गुरव यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या अपेक्षा, करिअरच्या संधी आणि आवश्यक तांत्रिक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून श्रेयश माने तर प्रा. एस. एम. रणभिसे हे विद्यार्थी शाखा समन्वयक म्हणून हे काम पाहणार आहेत. संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. तानाजी पाटील यांच्या सहकार्याने विविध तांत्रिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड को…