no images were found
यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती
वास्तववादी आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे ही कोणत्याही गुंतवणूकदारासाठी यशस्वी गुंतवणुकीच्या दिशेने पहिली पायरी आहे. सातत्याने परतावा देऊ शकणारा गुंतवणुकीचा पर्याय शोधणे महत्त्वाचे असले, तरी दीर्घकालीन दृष्टीने सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी त्याच्याशी संबंधित जोखीम समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अल्पकालीन ते दीर्घकालीन अशा विविध आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी म्युच्युअल फंडांच्या पर्यायांचा विचार करता येतो. यासाठी विविध मालमत्ता वर्गांमधील उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीतून गुंतवणुकीची निवड करता येते. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूकदार विचार करू शकतात अशा म्युच्युअल फंडाच्या एका उत्पादन श्रेणीविषयी येथे माहिती दिली आहे.
फ्लेक्सी-कॅप फंड हे ओपन-एंडेड इक्विटी फंड असून, त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 65% गुंतवणूक विविध बाजार भांडवलीकरण असलेल्या कंपन्यांच्या इक्विटी मालमत्तेत केली जाते. यामध्ये लार्ज-कॅप, मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप फंड कंपन्यांचा समावेश होतो. यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा या श्रेणीतील सर्वात जुन्या फंडांपैकी एक आहे (1992 मध्ये सुरू झालेला) आणि त्याचा सातत्यपूर्ण कामगिरीचा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड आहे. 31 ऑगस्ट 2026 रोजी या फंडाची एकूण मालमत्ता 24,100 कोटी रु. पेक्षा अधिक आहे. गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मूल्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या गुणवत्तापूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणारा फंड शोधणाऱ्या अशा कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी यूटीआय म्युच्युअल फंडाचा हा पर्याय योग्य आहे.
यूटीआय फ्लेक्सी कॅप फंडाची गुंतवणूक तत्त्वज्ञानाची उभारणी गुणवत्ता, वाढ आणि मूल्यांकन या 3 स्तंभांवर करण्यात आली आहे. दीर्घकाळ मजबूत वाढ दर्शविण्याची क्षमता असलेल्या आणि अनुभवी व्यवस्थापनाकडून चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणे हे पोर्टफोलिओचे धोरण असणार आहे.
“गुणवत्ता” म्हणजे एखाद्या व्यवसायाची दीर्घ कालावधीपर्यंत भांडवली गुंतवणुकीवरील उच्च परतावा (RoCE) किंवा इक्विटीवरील परतावा (RoE) उच्च पातळीवर टिकवून ठेवण्याची क्षमता. खरोखर त्यांच्या संबंधित उद्योगांसाठी किंवा क्षेत्रांसाठी कठीण काळ असतानाही उच्च RoCE आणि RoE निर्माण करू शकतात ते उच्च दर्जाचे व्यवसाय असतात आणि त्यामुळे नेहमीच त्यांच्या भांडवलाच्या खर्चापेक्षा अधिक परतावा मिळवतात. बहुतांश वेळा, उच्च RoCE/RoE असलेला व्यवसाय मजबूत रोख प्रवाह निर्माण करण्यास सक्षम असतो आणि हे मजबूत रोख प्रवाह आर्थिक मूल्यनिर्मितीचे स्रोत बनतात.
दुसरीकडे, “वाढ” म्हणजे व्यवसायाची दीर्घकालीन सातत्यपूर्ण वाढ. हा फंड चक्राकार आणि अस्थिर वाढीऐवजी स्थिर आणि अंदाज करता येण्याजोगी वाढीची दिशा असलेल्या व्यवसायांवर भर देतो. चक्राकार वाढ किंवा घसरण अत्यंत तीव्र आणि अनपेक्षित असू शकते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही दिशेने आश्चर्याचा धक्का बसू शकतो. याउलट, सातत्यपूर्ण वाढीच्या बाबतीत दीर्घकालीन वाढीमागील घटक समजून घेण्यात तुलनेने अधिक निश्चितता असते आणि त्यामुळे भविष्यातील परिणामांचाही अंदाज अधिक स्पष्टपणे घेता येतो. उच्च गुणवत्तेचे व्यवसाय आर्थिक मूल्य निर्माण करतात, तर उच्च वाढ असलेला व्यवसाय या आर्थिक मूल्याचे चक्रवाढीच्या माध्यमातून वृद्धीकरण करण्यास सक्षम असतो. त्यामुळेच, शेअर्सच्या निवडीसाठी गुणवत्तेचा आणि वाढीचा संगम हा फंडाचा आवडता निकष आहे.
फंडाच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचा शेवटचा स्तंभ म्हणजे “मूल्यांकन”. उत्तम व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मूल्यांकन हा महत्त्वाचा निकष आहे आणि त्यामुळे एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राइस-टू-अर्निंग्ज (P/E) गुणोत्तर हे एखाद्या व्यवसायाच्या मूल्यांकनाला समजून घेण्यासाठी चांगली सुरुवात असली तरी मूल्यांकनाच्या या पद्धतीबद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती आहेत. P/E हे दीर्घ कालावधीतील कंपनीची रोख प्रवाह निर्माण करण्याची क्षमता आणि मूल्यनिर्मितीची क्षमता दर्शवणारे केवळ एक संक्षिप्त मोजमाप आहे. बहुतांश वेळा, उच्च RoCE आणि उच्च वाढ असलेला व्यवसाय दीर्घकालीन दृष्टीने अधिक मूल्य निर्माण करतो आणि त्यामुळे गणिती दृष्ट्या त्याला अधिक उच्च P/E मिळणे योग्य ठरते. पुढील काही महिने किंवा तिमाहींमध्ये कोणता शेअर चांगली कामगिरी करेल याऐवजी व्यवसायाच्या मूलभूत बाबींच्या आधारे गुंतवणूक करणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अशी गुंतवणूक तरीही आकर्षक ठरू शकते. त्यामुळे केवळ P/E पाहून निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रत्येक व्यवसायाची वैशिष्ट्ये काळजीपूर्वक समजून घेणे आणि त्यानंतर प्रत्येक व्यवसायासाठी योग्य मूल्यांकनाची श्रेणी निश्चित करणे आवश्यक आहे. RoCE च्या संदर्भात P/E मुळे जितक्या गोष्टी उघड होतात त्यापेक्षा अधिक गोष्टी लपवलेल्या असतात आणि त्यामुळे व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी आणि मुक्त रोख प्रवाह यांच्या संदर्भात त्याचा नेहमी विचार केला पाहिजे.
हा फंड “वाढीच्या” गुंतवणूक शैलीचा अवलंब करत बाजार भांडवलीकरणाच्या संपूर्ण श्रेणीमध्ये गुंतवणूक करतो. 31 ऑगस्ट 2026 रोजी योजनेतील प्रमुख 10 गुंतवणुकींमध्ये एटर्नल लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड, कोफोर्ज लिमिटेड, डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड, इन्फो-एज (इंडिया) लिमिटेड, पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड यांचा समावेश असून, या गुंतवणुकींचा फंडाच्या एकूण पोर्टफोलिओतील हिस्सा सुमारे 44% आहे.
यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा आपला “मुख्य” इक्विटी पोर्टफोलिओ तयार करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या गुणवत्तापूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करू इच्छिणाऱ्या इक्विटी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. मध्यम जोखीम-प्रोफाइल असलेले आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किमान 5 ते 7 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणुकीचा विचार करू शकतात.