no images were found
हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये मागे घ्या आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात ! – अखिल भारत हिंदू महासभेचे निवेदन
कोल्हापूर, – मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी नवरात्रोत्सव सर्वसमावेक असून मुस्लीम व्यक्ती जर त्यात येत असेल, तर त्यात गैर काही नाही, असे वक्तव्य केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही अशाच आशयाचे विधान केले आहे. गेल्या काही वर्षांत नवत्रोत्सवात गैरहिंदूंनी फसवून आणि ओळख लपवून प्रवेश केल्याचे आणि यातून हिंदू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढत असल्याचे लक्षात आले आहे. तरी सौ. अमृता फडणवीस आणि श्री. संजय राऊत यांनी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यातआले. मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले हे निवेदन निवासी नायब तहसीलदार नम्रता चौगुले-शिराणे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास जाधव, उपाध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, शहराध्यक्ष श्री. शेखर वीरकर, राज्य संघटक श्री. मनोहर सोरप,जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, जिल्हा संघटक श्री. विनोद देसाई, प्रवक्ता श्री. सुनील सामंत, श्री. भीमसेन गाडीवडर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा अडदंडे, शीला माने, पूजा गाडीवडर, निलांगी पाटील, वैशाली ढंग उपस्थित होत्या.
* मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
१. नवरात्रोत्सव काळात गरबा उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी नवरात्रोत्सव काळात कुठेही गुप्त चित्रीकरणाचा प्रकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात
२. प्रत्येक गरबा प्रवेशद्वारावर ओळखपत्र पडताळणी सक्तीची करावी, तसेच संशयास्पदरित्या वावरणार्या व्यक्तीची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात द्यावी.
३. प्रत्येक मंडळात महिला पोलीस कर्मचारी, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, महिला साहाय्यता क्रमांक देण्याचे बंधन करावे.
४. ओळख लपवून प्रवेश करणार्या वक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१९ अन्वये गुन्हा नोंद करावा.