Home Uncategorized गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

36 second read
0
0
8

no images were found

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करा : आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर,: गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज पाहणी केली. शाहू खासबाग मैदान येथून पाहणीस सुरुवात करून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा, इराणी खण तसेच पर्यायी विसर्जन मार्गावरील हॉकी स्टेडियम, उमा टॉकीज, राजारामपुरी परिसरातील मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.

            या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मिरवणूक व विसर्जन मार्गावरील आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क संबंधित ठेकेदारामार्फत करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच गणेशोत्सवासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहर अभियंत्यांनी चारही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्ते व मिरवणूक मार्गांवर पावसाने उघडीप दिल्यानंतर तात्काळ डांबरी पॅचवर्क करण्याच्या सूचना दिल्या. श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग तसेच विसर्जनस्थळी विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मंडप व बॅरिकेडिंगची कामे वार्षिक ठेकेदारामार्फत करून घेण्याबरोबरच वाहन व हमाल व्यवस्थेचे मागील वर्षाप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंडप उभारणीसाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या मर्यादेचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व उपशहर अभियंत्यांना देण्यात आले. इराणी खण येथील स्वयंचलित यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्ती तातडीने पूर्ण करून ती कार्यक्षम स्थितीत ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. इराणी खण तसेच विभागीय कार्यालयांमध्ये कर्मचारी व पथकांसाठी जेवण, चहा व नाश्त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे क्रेन उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी, विविध पथके व कर्मचारी नियुक्ती तसेच विसर्जन व्यवस्थेचे मागील वर्षाप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस निरिक्षक किरण लोंढे, विकास जाधव, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सहाय्यक विद्युत अभियंता नारायण पुजारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कलाकार सांगतात कसे खेळ त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शारीरिक आणि मानसिक संतुलन राखायला मदत करतात

फिटनेसपासून फोकसपर्यंत: सोनी सब कलाकार सांगतात कसे खेळ त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्…